New Ration Card Apply | आता घरबसल्या नवीन रेशन कार्ड काढा रेशन कार्ड संबंधित सर्व माहिती एकाच ॲपवर पहा

New Ration Card Apply | आता घरबसल्या नवीन रेशन कार्ड काढा रेशन कार्ड संबंधित सर्व माहिती एकाच ॲपवर पहा

New Ration Card Apply | एका ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशनकार्डशी संबंधित सर्व सेवा मिळवू शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा तर वाचेलच पण घरबसल्या काम होण्याची शाश्वती आहे.

रेशनकार्ड हे प्रत्येक कुटुंबाचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे अनेकवेळा लोकांना ते कसे अपडेट करायचे असा प्रश्न पडतो. कारण सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात.

मात्र आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे नाव रेशनकार्डमध्ये जोडू शकता.

तसेच तुम्हाला तुमचे नाव रेशनकार्डमधून काढायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता. याबाबत सरकारने एक मोबाईल ॲप लाँच केले असून, त्याद्वारे रेशन कार्ड बनवणे आता सोपे झाले आहे.

तुम्ही Google Play Store वरून Mera Ration 2.0 सहज डाउनलोड करू शकता आणि या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व सेवा मिळवू शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा तर वाचेलच पण तुम्हाला घरबसल्या ही गोष्ट करता येईल.

Mera Ration 2.0 च्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशनकार्डशी संबंधित प्रत्येक काम करू शकाल. त्यासाठी तुम्हाला कुठेही धावपळ करावी लागणार नाही आणि तुम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.

ॲपवर माहिती अशाप्रकारे बघा

Mera Ration 2.0 डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला त्याच्या प्ले स्टोअर होम पेजवर यावे लागेल.

या पेजवर आल्यानंतर तुम्हाला Mera Ration 2.0 शोधावे लागेल. आता तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल.

डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल. आता तुम्हाला ॲपवर सर्व सुविधा दिसतील. यामध्ये तुम्हाला ज्या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यावर क्लिक करून आवश्यक माहिती टाकावी लागेल.

त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करून सबमिट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती दिली जाईल.

खालीलप्रमाणे आवश्यक लागणारे कागदपत्रे

नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला हे कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट), रहिवासी प्रमाणपत्र (वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट), कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्रे लागतात.

Leave a Comment

Close Visit agrinews