MSRTC News Today | एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना अडचण आल्यास लगेच फोन करा येणाऱ्या अडचणींवर महामंडळाचा मोठा निर्णय

MSRTC News Today | एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना अडचण आल्यास लगेच फोन करा येणाऱ्या अडचणींवर महामंडळाचा मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो, वाहक उद्धट बोलतो किंवा वाहकाने योग्य ठिकाणी आम्हाला उतरवले नाही, अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात.

एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगारप्रमुखांना फोन करून निवारण करून घ्या, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

त्यामुळे प्रवाशांच्या अडचणींचे निराकरण करणे सोपे होणार आहे. त्यासाठी आगारप्रमुखांसह इतर महत्त्वाचे दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानकप्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे.

यापूर्वी एसटी बसमध्ये संबंधित आगाराचा व स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध केला असायचा; परंतु काही काळाने हे नंबर दिसेनासे व्हायचे. त्यामुळे एसटीच्या प्रवासामध्ये काही समस्या अथवा अडचण आल्यास त्यासाठी दाद कोणाकडे मागावी,

हा एक मोठा प्रश्न प्रवाशांच्या समोर होता. त्यामुळे त्यांच्याच सूचनेवरून एसटी महामंडळाने आता प्रत्येक बसमध्ये ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.

एसटी प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान त्यांना एखाद्या अडचण आल्यास थेट दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपल्या अडचणीत अथवा समस्येचे निवारण तातडीने करून घ्यावे.

तक्रारी कोणत्या असतात

एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत आहे, चालक गाडी चालवताना मोबाइलवर बोलत आहे, वाहक उद्धट बोलतो किंवा वाहकाने योग्य ठिकाणी आम्हाला उतरवले नाही, अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात.

Leave a Comment

Close Visit agrinews