मासिक आर्थिक मदत: या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जातात.
व्यापक लक्ष्य गट: या योजनेचा लाभ राज्यातील विविध वयोगटातील व सामाजिक स्तरातील महिलांना मिळू शकतो.
सोपी अर्ज प्रक्रिया: या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सरळ व सोपी ठेवली आहे.
पात्रता खालीलप्रमाणे
अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
तिचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे.
अर्जदाराकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
तिच्या नावावर बँक खाते असणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे आधार कार्ड सीडिंग करा
npci.org.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवरील ‘Consumer’ या टॅबवर क्लिक करा.
आधार क्रमांक, बँकेचे नाव आणि खाते क्रमांक भरा.
कॅप्चा कोड भरा आणि ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
यानंतर तुमची विनंती प्रक्रियेत जाईल आणि तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होईल.