Land Record | आता घरबसल्या मोबाईलवर शेत जमीनीचा नकाशा डाऊनलोड करा फक्त दोन मिनिटांत
Land Record | नमस्कार मित्रांनो, आज आपण जमीन मोजणी अर्ज संबधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेत जमीन मोजणीसाठी ऑफलाईन अर्ज व ऑनलाइन अर्ज संदर्भात बऱ्याच शेतकरी बांधवांना या लेखामुळे नक्कीच फायदा होणार आहे.
शेत जमीन मोजणी अर्ज कसा करतात तो अर्ज कोठून डाउनलोड करावा, त्याची प्रिंट कशी काढावी आणि तो अर्ज कोणाकडे सादर करावा हि संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत.
तुम्हाला शेत मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपले सरकार या वेबसाईटवर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन कसे करावे हे बघणार आहोत.
तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर नवीन युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी नोंदणी कशी करावी या संदर्भात अगदी तपशीलमध्ये माहिती सांगणार आहे.
शेतीमध्ये सर्वात जास्त भांडण होण्याचे जे कारण आहे ते म्हणजे शेताचा बांध होय, शेताच्या बांधामुळे शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात वाद होण्याची शक्यता असते त्यामुळे जमिनीची मोजणी होऊन आपापल्या शेतातील बांध निश्चित निश्चित केल्यास शेतातील वाद कमी होण्याची शक्यता असते आणि त्यासाठी शेत जमीन मोजणी अर्ज विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
शेत जमीन मोजणी करण्यासाठी अर्ज डाउनलोड कसा कराल.
सर्वात अगोदर ऑफलाईन अर्जाची प्रक्रिया कशी असते ते जाणून घेवूयात.
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास एक अर्ज सादर करावा लागतो. अर्ज कसा असतो हे आता आपण जाणून घेवूयात.
शेतजमीन मोजणीचा हा अर्ज तुम्हाला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करायचा असेल तर महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर हा अर्ज उपलब्ध आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.
शेत जमीन मोजणी अर्ज प्रिंट किंवा डाउनलोड करा.
शेत जमीन मोजणी अर्ज डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइलच्या ब्राउजरमध्ये टाईप करा https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ त्यानंतर सर्च करा.
तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महाराष्ट्र राज्य भूमीअभिलेख विभागाची वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर निळ्या रंगाच्या पट्टीवरील डाऊनलोड या बटनावर क्लिक करा.
शेत जमीन मोजणी अर्ज डाउनलोड करण्नयासाठी मोजणी अर्ज नमुना या बटनावर क्लिक करा.
त्यानंतर हा शेत जमीन मोजणी अर्ज तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर किंवा मोबाईलवर मोजणी अर्ज दिसेल.
तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेले असेल तर प्रिंट या बटनावर क्लिक करताच हा शेत जमीन मोजणी अर्ज प्रिंट होईल किंवा तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर फोल्डर या बटनावर क्लिक करा त्यानंतर हा अर्ज तुमच्या मोबाईलअध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड होईल.
शेत जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली.
- नवीन युजर येथे नोंदणी करा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
- UID किंवा self details या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.
- त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सर्व तपशील भरा.
- कागदपत्रा आधारे अर्जदाराचा पत्ता भरा.
- मोबाईल नंबर टाका युजरनेम आणि पासवर्ड निवडा.
- त्यानंतर अर्जदारांनी स्वतः फोटो अपलोड करा.
- ओळखपत्रासाठी दिलेल्या यादीमधून एक कागदपत्र अपलोड करा.
- रहिवासीसाठी दिलेल्या यादीमधून एक कागदपत्र अपलोड करा.
- त्यानंतर रजिस्टर करा.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा