Hail Member Rain Weather Forecast | मोठी बातमी राज्यात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

Hail Member Rain Weather Forecast | मोठी बातमी राज्यात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

Hail member rain weather forecast | नमस्कार मित्रांनो, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या हालचाली सुरू झाल्या असून २३ ऑक्टोबर रोजी ते वेग घेणार आहे. त्यामुळे देशभरात पाऊस वाढणार आहे.राज्यातील काही भागांत २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान किरकोळ गारपीट होऊ शकते, असाही अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तीन दिवसांपूर्वी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्याचे रूपांतर रविवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले.त्यामुळे देशभरात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. महाराष्ट्रात उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत किरकोळ गारपीट होऊ शकते, असाही अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.

ही गारपीट प्रामुख्याने २१ ते २३ ऑक्टोबरमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर या भागांत होईल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

राज्यावर कमी परिणाम बंगालच्या उपसागरात २३ रोजी चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे पूर्वोत्तर आणि दक्षिण भारताला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

खासकरून सागरी किनारपट्टी भागाला अतिसावधानतेचा इशारा दिला आहे. २४ व २५ रोजी त्या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्रातील काही भागांत मध्यम पाऊस व किरकोळ गारपीट वगळता मोठ्या पावसाची शक्यता नाही.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews