Get rid of cockroaches from the house | घरातील पाली – झुरळांवर एक जबरदस्त उपाय डांबर गोळी पाण्यात घालताच पाली – कॉकरोच मिनिटात होतील छुमंतर

Get rid of cockroaches from the house | घरातील पाली – झुरळांवर एक जबरदस्त उपाय डांबर गोळी पाण्यात घालताच पाली – कॉकरोच मिनिटात होतील छुमंतर

नमस्कार मित्रांनो, पाली – कॉकरोच मिनिटात होतील छुमंतर किचनमध्ये किंवा घरात पाली आणि कॉकरोच येतातच (Cleaning Tips). घरात कुठेही घाण असेल तर, कॉकरोच तयार होतात. शिवाय पालीही घरभर फिरतात.

झुरळं आणि पालींना पाहून आपल्याला किळसवाणे वाटते, पण याशिवाय यांच्यामुळे घरात रोगराईही पसरते (Cockroaches). जेवणात किंवा भांड्यांजवळ झुरळं आणि पाली (Lizards) फिरल्याने पदार्थ विषारी होते.

किचनमध्ये कधी कॉकरोच आणि पाली फिरतील हे सांगता येत नाही. त्यामुळे वेळीच यांचा बंदोबस्त केलेला बरा. जर घरात झुरळं आणि पालींचा वावर वाढला असेल तर,

केमिकल रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा डांबर गोळीचा सोपा उपाय करून पाहा. काही मिनिटात कॉकरोच आणि पाली घरातून पळ काढतील.

डांबरगोळीचा करा असा वापर; पाली – कॉकरोच मिनिटात होतील छुमंतर

खालीलप्रमाणे व्हिडिओ मध्ये पहा

सर्वात आधी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात एक डांबर गोळी टाका. डांबर गोळी वितळल्यानंतर त्यात एक कापूर घालून मिक्स करा.

डांबर गोळी आणि कापूर पाण्यात वितळल्यानंतर गॅस बंद करा. तयार पाणी थोडं थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. नंतर त्यात 2-3 चमचे फ्लोअर क्लीनर लिक्विड घालून मिक्स करा.

अशा प्रकारे आपलं पाली कॉकरोच यांना पळवणारं स्प्रे रेडी. ज्या ठिकाणी पाली आणि कॉकरोच यांचा वावर आहे. त्या ठिकाणी स्प्रे करा. डांबर गोळीच्या उग्र वासामुळे किडे पळ काढतील.

Leave a Comment

Close Visit agrinews