Cibil Score | क्रेडीट स्कोर खराब झाला तर अशाप्रकारे सुधारणा करा
Cibil Score | नमस्कार मित्रांनो, मोबाइल वॉलेट ॲप पेटीएमने सिबिल स्कोअर तपासण्याची सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही तुमचा क्रेडीट रिपोर्ट मोफत पाहू शकता. तसेच सक्रीय क्रेडीट कार्ड आणि कर्ज खात्यांचा क्रेडीट अहवाल देखील पाहू शकतात.
तुमचा क्रेडीट स्कोर खराब झाला असले तर त्याचा परिणाम सिबिल स्कोरवर होतो. कोणतेही कर्ज हवे असेल तर हा सिबिल स्कोर चांगला हवा असतो. तुमचा क्रेडीट स्कोर जितका चांगला असेल तितकी चांगली तुमची आर्थिस परिस्थिती समजली जाते.
परंतु अनेकवेळा काही चुका होतात, ज्यामुळे क्रेडीट स्कोर खराब होतो. त्याचा परिणाम सिबिल स्कोरवर होते. हा सिबिल स्कोर चांगला करण्यासाठी पाच फंडा वापरता येतील.
वेळेवर लोनचे पेमेंट करा
तुमचे क्रेडीट कार्ड बिल, लोन आणि इतर हप्ते वेळेवर भरा. त्यात उशीर केला तर तुमच्या क्रेडीट स्कोरवर परिणाम होतो. तुमच्या लोन पेमेंटचे रेकॉर्ड जितके चांगले असेल तितका तुमचा स्कोर चांगला होईल.
क्रेडीट युज कमी ठेवा
तुमच्या एकूण क्रेडीट लिमिटच्या तुलनेत वापरण्यात येणारी रक्कम म्हणजे क्रेडीट युज आहे. तुम्ही क्रेडीट लिमिट फक्त ३० टक्के वापरा. म्हणजे क्रेडीट लिमिट दहा हजार असेल तर तीन हजारापेक्षा जास्त रक्कम शिल्लक ठेऊ नका.
जुना क्रेडीट कार्ड बंद करु नका
क्रेडीट इतिहास तुमच्या CIBIL स्कोअरवर देखील परिणाम करतो. तुमचा क्रेडीट इतिहास जितका जुना असेल तितका चांगला CIBIL स्कोर असतो. यामुळे तुमच्याकडे जुने क्रेडिट कार्ड खाते असेल जे तुम्ही वापरत नाही, तर ते बंद करणे टाळा.
नवीन कर्ज घेताना काळजी घ्या
जेव्हा तुम्ही नवीन कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा क्रेडीट रिपोर्ट तपासला जातो. यामुळे तुमचा स्कोअर थोडा कमी होऊ शकतो. त्यामुळे, कमी कालावधीत एकापेक्षा अधिक कर्जासाठी अर्ज करणे टाळा.
क्रेडीट रिपोर्ट तपासा
तुमच्या क्रेडीट रिपोर्टमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत याची खात्री करण्यासाठी दरवर्षी तुमचा क्रेडीट रिपोर्ट तपासा. काही त्रुटी आढळल्यास त्या त्वरित दुरुस्त करा.
मोबाइल वॉलेट ॲप पेटीएमने सिबिल स्कोअर तपासण्याची सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही तुमचा क्रेडीट रिपोर्ट मोफत पाहू शकता. तसेच सक्रीय क्रेडीट कार्ड आणि कर्ज खात्यांचा क्रेडीट अहवाल देखील पाहू शकतात.